मला लागली कुणाची उचकी,Mala Lagali Kunachi Uchaki

आलि आलि सुगि, म्हणून चालले बिगि बिगि
गोष्ट न्हाइ सांगण्याजोगि
कुनी गालावर मारली टिचकी
मला लागली कुणाची उचकी

( कुणाची गं कुणाची ? ह्याची का त्याची ? लाजू नको, लाजू नको )

तरणीताठी, नार शेलाटी, चढले मी बांधावर
अटकर बांधा, गोरा गोरा खांदा, पदर वाऱ्यावर
फडामध्ये चाहुल, वाजलं त्याचं पाउल
माझ्या उरात भरली धडकी

निजले डाव्या कुशी, हाताची उशी, करुन मी कशी
वाऱ्याच्या लाटा, थंडीचा काटा, मनात न्यारी खुषी
सपनात आला, त्यानं छेडलं बाई मला
त्याच्या डोळ्याची नजर तिरकी

उठून सकाळी, ल‍इ येरवाळी, गेले पानोठ्यावरी
उन्हात बसले न्हात, अंगाला पानि गुदगुल्या करी
पाण्यामध्ये दिसं, त्याचं लागलं मला पिसं
त्यानं माझीच घेतली फिरकी

रात दिसं जागते, वाट त्याची बघते, किती मी घालू साद
झोप माझी उडली, जादू कशी घडली, जाई ना त्याची याद
भेटीसाठी आले मनी, कासाविस झाले मी, माझी मलाच परकी

No comments:

Post a Comment