माझ्या कपाळीचं कुकु
कवतिकानं किती बाई निरखू
जीव भरंना, भरंना, भरंना
खरं वाटंना, वाटंना, वाटंना
कुण्या जल्मीची पावली पुण्याई
झाली परसन आई अंबाबाई
चिरी कुकवाची लखलख निरखू
सुर्व्या सांजचा, चांद पुनवंचा
सर्गाची गं सुभा, दारी आनंद हुभा
चिरी कुकवाची लखलख निरखू
टाकीन वोवाळून हिरं, मोती, सोनं
पिरती मोलाचं कुकवाचं लेनं
चिरी कुकवाची लखलख निरखू
कवतिकानं किती बाई निरखू
जीव भरंना, भरंना, भरंना
खरं वाटंना, वाटंना, वाटंना
कुण्या जल्मीची पावली पुण्याई
झाली परसन आई अंबाबाई
चिरी कुकवाची लखलख निरखू
सुर्व्या सांजचा, चांद पुनवंचा
सर्गाची गं सुभा, दारी आनंद हुभा
चिरी कुकवाची लखलख निरखू
टाकीन वोवाळून हिरं, मोती, सोनं
पिरती मोलाचं कुकवाचं लेनं
चिरी कुकवाची लखलख निरखू
No comments:
Post a Comment