माझिया माहेरा जा,Majhiya Mahera Ja

माझिया माहेरा जा, रे पाखरा
माझिया माहेरा जा

देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन
वाट दाखवाया नीट माझी वेडी आठवण
मायेची माउली, सांजेची साउली
माझा ग भाईराजा

माझ्या रे भावाची उंच हवेली
वहिनी माझी नवी-नवेली
भोळ्या रे सांबाची, भोळी गिरिजा

अंगणात पारिजात, तिथे घ्या हो, घ्या विसावा
दरवळे बाई गंध, चोहीकडे गावोगावा
हळूच उतरा खाली, फुलं नाजुक मोलाची
माझ्या मायमाऊलीच्या, काळजाच्या की तोलाची
'तूझी ग साळुंकी, आहे बाई सुखी'
सांगा पाखरांनो, तिचिये कानी
एवढा निरोप माझा

No comments:

Post a Comment