मज सुचले ग मंजुळ,Maj Suchale Ga Manjul

मज सुचले ग, सुचले मंजुळ गाणे
हिंडता डोंगरापाठी सापडले कोरिव लेणे

विसरल्या उन्हातिल वाटा, विसरले पथातिल काटे
ही गुहा भयावह आता स्वप्नासम सुंदर वाटे
रसभाव भराला आले काव्याहुन लोभसवाणे

बोलाविन घुमती वाद्ये, तालात नाचते प्रीती
शब्दाविन होती गीते, बेभान भावना गाती
हा लाभ अचानक झाला, हे कुण्या प्रभूचे देणे

आकृति मनोहर इथल्या, मी एक त्यातली झाले
लावण्य बरसते येथे सर्वांग तयात मी न्हाले
सौंदर्य जीवना आले, जन्माचे झाले सोने

No comments:

Post a Comment