महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी,Maharashtrachya Krishne

महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी
मुशाफिरा चल माझ्यासाठी

अपूर्व सुंदर मूर्त होऊनी
जिथे नांदते शौर्य मराठी
हरहर गर्जत जरिपटक्याची
जिथे नाचली भगवी काठी

रक्त ठिबकल्या समशेरीचा
टिळा शोभतो जिच्या ललाटी
जिने उधळली शिवचरणावर
जलपुष्पे ती अनंतकोटी

नीत्य राहती दत्तदिगंबर
जिच्या तटावर भक्तीसाठी
जिला लागली स्मर्थ गुरुनी
चैतन्याची शिकवण मोठी

शीळ घालते नरसिंव्हांना
जिथे लावणी सुस्वरकंठी
थाप डफावर ऐकून प्रेते
उठली येथे क्रांतीसाठी

No comments:

Post a Comment