मागते मन एक काही,Magate Man Ek Kahi

मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते
उमलण्या आधीच कैसे, फूल पायी तुडविते !

खेळ नियती खेळते की, पाप येते हे फळा
वाहणाऱ्या या जळाला कोण मार्गी अडविते ?

ईश्वरेच्छा हीच किंवा, संचिताचा शाप हा
चंद्ररेखा प्रतिपदेची कोण तिमिरी बुडविते ?

No comments:

Post a Comment