मधुवंतीच्या सुरासुरांतुन,Madhuvantichya Surasuratun

मधुवंतीच्या सुरासुरांतुन आळविते मी नाम
एकदा दर्शन दे घनश्याम !

नयनी माझ्या गोकुळ वसले
यमुनेचे जळ गाली झरले
राधेपरि मी सर्व वाहिले सुखशांतीचे धाम !

वसंतातले सरले कूजन
तुझ्याविना हे उदास जीवन
शोधित तुजला फिरते वणवण, नाहि जिवा विश्राम

दासी मीरा ये दाराशी
घे गिरिधारी, तव हृदयाशी
या पायाशी मथुरा काशी, तीर्थापरि हे नाम !No comments:

Post a Comment