मधुरिके नाच चंद्रिके,Madhurike Nach Chandrike

मधुरिके नाच, चंद्रिके नाच
गीत मधाचे गात, आज प्रीतिची रात

दिवस कालचा सरला गेला
घडायचे ते घडो उद्याला
हा आताचा क्षण मोलाचा
मन:पूत घे स्वाद तयाचा
गुंतव हातात हात, आज प्रीतिची रात

जननीतीचा धाक फुकाचा
हा तर उत्सव स्पर्शसुखाचा
गाल लाव ये अलगद गाला
प्रीत उमगु दे सर्वांगाला
वाच गुपित डोळ्यात, आज प्रीतिची रात

नाच यौवना हलवित कंबर
दिवे नाचती, नाचे झुंबर
ताल नाचतो, सूर नाचती
मना न आता बंध काचती
लय भरली पायात, आज प्रीतिची रात

No comments:

Post a Comment