मधुराणी तुला सांगू का,Madhurani Tula Sangu Ka

मधुराणी तुला सांगू का ?
तुला पाहून चाफा पडेल फिका

मधुराजा तुला सांगू का ?
मला म्हणुनीच लाभे सुरेख सखा

तुझ्या रंगात काही निराळी छटा
तुझ्या बेबंद भाळी खिलाडू बटा
तुझे मखमाली हात
तुझे अवखळ दात
नको फिरवूस राणी मुखा

हा आनंद नाही कधी लाभला
तनू अर्पीत होते मनाने तुला
मला कळले न गूज
नसे पुरुषांना बूज
घेई पदरात साऱ्या चुका

चंद्रमौली हा संसार झाला सुरू
उभे मंदिर येथे उद्याला करू
तुझे मर्दानी हात
तुझ्या प्रीतीची साथ
दारी मोहोर यावा सूखा

No comments:

Post a Comment