आज आले उद्या मी येणार बी न्हाई
औंदा लगीन करायचं हाय मला देखणा नवरा हवा ग बाय
मला कोकण्या नवरा हवा ग बाई मला कोकण्या नवरा हवा ग
मला झोपाच्या झोपडीत ठेवीन ह्यो, मला ताडाचं ताडगोळं देईल ह्यो
मला दऱ्या किनारी नेईल ह्यो
अंगानं बुटका, बोलण्यात नेटका, एकच घोटाळा होई
त्याच्या शेंडीची गाठ मला सुटायची न्हाई, मला कोकण्या नवरा नको ग बाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
वऱ्हाडी नवरा हवा ग बाई मला वऱ्हाडी नवरा हवा ग
मी वऱ्हाडी नवरा पाह्यलाय ग, बाग संत्र्याची करून ऱ्हायलाय ग
भाव कापसाचा तेजीत वाढलाय ग
अंगानं भक्कम, खिशात रक्कम, एकच घोटाळा होई
मी उन्हाचा फटका खायाची न्हाई, मला वऱ्हाडी नवरा नको ग बाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
मला कोल्हपुरी नवरा हवा ग बाई मला कोल्हापुरी नवरा हवा ग
नवरा बगीन कोल्हापुरी .... कोल्हापुरी !
दूध पिऊन तालीम करी .... कोल्हापुरी !
त्याच्या अंगात लई सुर्सुरी ग बाई त्याच्या अंगात लई सुर्सुरी
तमाशा बघता, घरला येता, एकच घोटाळा होई
मला मिरचीचा झटका सोसायचा न्हाई मला कोल्हापुरी दामला नको ग बाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
म्हंबईचा नवरा हवा ग बाई मला म्हंबईचा नवरा हवा ग
माझा नवरा म्हंबईवाला
त्याच्या लोकलचा टाईम झाला
रोज न्याराच करतोय चाळा
केसांचा कोंबडा, मफलर तांबडा, एकच घोटाळा होई
त्याच्या पँटवर माझा भरवसा न्हाई मला कंचाच नवरा नको ग बाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
No comments:
Post a Comment