भय इथले संपत नाही,Bhay Ithale Sampat Nahi



भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे


5 comments:

  1. मी कवी नाही,मि संगीतकार नाही,मि गायक नाही.मि काय म्हणणार? फक्त अप्रतिम दुसरे काय?

    ReplyDelete
    Replies
    1. चांगला रसिक असणं आणि स्वतःशी प्रामाणिक असणं हे काय कमी आहे?

      Delete
  2. Awesome song...,,,

    ReplyDelete