भरलं आभाळ पावसाळी,Bharala Aabhal Pavasali

भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना

पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना

निळ्या डोळ्यांवरी मेघूटांच्यापरी
वाट पाहिली डोळां चळ थांबेना
श्रावणाचं ऊन मला झेपेना

श्रावणाच्या सरी पानभरी थर्थरी
हिर्व्या मोराची थुईथुई थांबेना
निळ्या मोराची थुईथुई थांबेना
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेनाNo comments:

Post a Comment