भक्तिच्या फुलांचा बोलतो,Bhaktichya Phulancha Bolato

भक्तिच्या फुलांचा बोलतो सुवास
तुझा देव येतो तुला भेटण्यास

चंदनाचा देह उटी उगाळीत
प्राणदीप माझा लावी फुलवात
धूप जाळी देवा अंतरीचा ध्यास

देवा तुझ्यावरी जीव फूल वाही
नामाची तुझिया आरती मी गाई
ध्यानमग्न होता या हो सावकाश

पडता घरात देवाचे पाऊल
जाहले घराचे मंगल देऊळ
नित्य घडो देवा तुझा सहवास

No comments:

Post a Comment