बिजलीचा टाळ नभाचा मृदंग
तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग
थरथरावा कधी रे वादळचा वेल
भक्तीभाव वाऱ्यावरी मधूर झुलेल
तरंगतो अंतराळी भावपूर्ण ढंग
दीपराग गाउनिया सदा चंद्र-सूर्य
सृष्टी-मैफिलीत खुलवी सुरम्य सौंदर्य
झळकती नादांतरी निखळ सप्तरंग
निशीदिनी नित्यनेमे चाले संकीर्तन
किरणांच्या आरतीने सतेज वंदन
मांगल्यात ऋतुऋतूंचे मोहरले अंग
No comments:
Post a Comment