पूर्व दिशेला अरुण-पथावर,Purva Dishela Arun Pathavar
पूर्व दिशेला अरुण-पथावर
ध्वज सोन्याचा झळकत सुंदर
पर्णांमधुनी किरण कोवळे
चिलापिलांचे उघडी डोळे
पंख उभारुनी उडती गगनी
सात सुरांनी उजळे अंबर
अरुण-उषेच्या मीलन काली
प्राजक्ताच्या झाडाखाली
फुले वेचली भरून ओंजळी
गुंफिन प्रभूला माळ मनोहर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment