प्रिये पहा रात्रीचा समय,Priye Paha Ratricha Samay

प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि येत उषःकाल हा ॥

थंडगार वात सुटत । दीपतेज मंद होत ।

दिग्वदनें स्वच्छ करित । अरुण पसरि निज महा ॥

पक्षि मधुर शब्द करिति । गंजारव मधुप वरिति ।
विरलपर्ण शाखि होति । विकसन ये जलरुहा ॥

सुखदुःखा विसरुनियां । गेलें जें विश्व लया ।
स्थिति निज ती सेवाया । उठलें कीं तेंची अहा ॥



2 comments:

  1. प्रिये पहा.. या गीताचा अर्थ कृपया कळवावा

    ReplyDelete
  2. ह्या गाण्याचा अर् रसग्रहण करावे

    ReplyDelete