प्रिया, साहवेना आता, एकलेपणा
अशा पौर्णिमेच्या रात्री, कसा दाह होतो गात्री, सांगु रे कुणा
घातली जुईची वेणी तुझ्या आवडीची
वाट पाहताहे गंध तुझ्या मीलनाची
जरा शो घे रे वाऱ्या, कुठे सांडल्या रे साऱ्या, प्रीतिच्या खुणा
प्रिया साहवेना आता एकलेपणा
येइना कशी रे कानी तुझी आर्त साद
काय बोलले मी, माझा कोणता प्रमाद
तुझे मौन कैसे साहू, नको यापरी दुखावू, पोळल्या मना माझ्या
प्रिया साहवेना आता एकलेपणा
No comments:
Post a Comment