प्रिया तुज काय दिसे,Priya Tuj Kay Dise

प्रिया तुज काय दिसे स्वप्नात ?
आनंदाचे पाझर फुटले मिटलेल्या नयनांत

मनासारखी मिळे सहचरी, फुलुन दरवळे सुख संसारी
नकळे केव्हा येती जाती, दिवस आणखी रात

तुला न उरली तुझी आठवण, मी तर झाले तुला समर्पण
दुजेपणाचे नाव न उरले, दोघांच्या जगतात

मोहरलेल्या या ऐक्यावर, एक होतसे नवखी थरथर
दिसल्यावाचून जाणवते मज, नवल आतल्या आत

No comments:

Post a Comment