एक हात तुझा, एक हात माझा,
घागर उचलुनी घेते
प्रीत माझी पाण्याला जाते
गव्हाळी वाणाचा हसरा मुखडा
फुलकळी नाकाला, नथीचा आकडा
हेरला प्रीतिनं गुलजार फाकडा
चोरुनि त्याला भेटाया जाते
मोहर आंब्याला पहिला आला
मैनेला राघू भेटुनि गेला
लागला पिकांना पाण्याचा लळा
कुहुकुहु गीत कोकिळा गाते
चंद्रकळा काळी, सुगंधी साज
शपथ गळ्याची घेणार आज
खुदुखुदु गाली हसली, लाज बाई
रंगले गुलाबी प्रीतीचे नाते
No comments:
Post a Comment