प्रीत रंगली ग कशी,Preet Rangali Ga Kashi

प्रीत रंगली ग कशी राजहंसी
अग बाई ग लाजली हंसी, बोले ना ती तुझ्याशी,
बोले ना ती तुझ्याशी !


तुझिया कपोली प्रीत रंगली ग - लाजून हसली
बघ इकडे ग - धरिसी कशाला पदर उराशी
तुझी रे हंसी, फसली कैसी, पडली पाशी,
धीट किती हा रमण विलासी,
बोले ना ती तुझ्याशी !

रुसली राणी, डोळा पाणी, हास्य आननी
नजर तुझी घे - थरथरणारी - वरती जराशी
गोड बोलुनी, प्रेम दावुनी, हृदय जिंकुनी,
जाल सोडुनी, कुठे दूर देशी,
बोले ना ती तुझ्याशी !



No comments:

Post a Comment