प्रेम हे माझे-तुझे बोलायचे नाही कधी
भेटलो आता परि भेटायचे नाही कधी
तू उभी जवळी अशी, खुणवी जरी एकांत हा
कालच्या सलगीतुनी बिलगायचे नाही कधी
या जगी माझे-तुझे दुरुनीच नाते शोभते
त्या जुन्या स्मरुनी खुणा जागायचे नाही कधी
होतसे सारेच का अपुल्या पसंतीसारखे
यापुढे शहरात या बहरायचे नाही कधी
जाउ दे ही पालखी माझी तुझ्या दारातुनी
तू तुझे आयुष्य हे उधळायचे नाही कधी
राम मोरे या गीतकार कवींबद्दल काहीच माहिती मिळत नाही...कोणाकडे असेल तर कृपया शेअर करावी..खूप छान गाणी आहेत त्यांची
ReplyDelete