पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा
वधु लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा !
बाजुबंद त्या गोठ-पाटल्या बिलवर नक्षीदार
तुझ्या हृदी ग कुणी छेडिली रतिवीणेची तार
सांग कुणी ग अंगठीत या तांबुस दिधला खडा !
मुंडावळि या भाळी दिसती काजळ नयनांगणी
करकमळापरी कुणी गुंफिले सुवासिनीचे मणी
आठवणींचा घेउन जा तू माहेराचा घडा !
स्वप्नफुलांसह रमत रहा तू प्रेमळ संसारी
भाग्यवेल ही मोहरेल ग उद्या तुझ्या दारी
सौख्य पाहता भिजु दे माझ्या डोळ्यांच्या या कडा !
No comments:
Post a Comment