पायावरी प्रियाच्या सर्वस्व,Payavari Priyachya Sarvasva

काया जरी निमाली का प्रीत ओसरेल?
छायेपरी सदा ती मागे तुझ्या फिरेल

पायावरी प्रियाच्या सर्वस्व वाहणारी
मी एक प्रेमवेडी प्रीतीच पाहणारी !

प्रीतीसवे हसावे, प्रीतीसवे रुसावे
प्रीतीशिवाय काही डोळ्यांस ना दिसावे
त्या धुंद भावनेच्या स्वप्नात राहणारी
मी एक प्रेमवेडी प्रीतीच पाहणारी !

दोघांमधील आहे प्रीती युगायुगांची
वेडावल्या जिवाला पर्वा नसे जगाची
ज्योतीवरी पतंग पंखास दाहणारी
मी एक प्रेमवेडी प्रीतीच पाहणारी !

No comments:

Post a Comment