परी म्हणू की सुंदरा तिची तऱ्हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली
तिचे वळून पाहणे
मधाळ गोड बोलणे
कधी खट्याळ हासुनी,
हळूच जीभ चावणे
मोकळा करुन मीच हे कधीच दिल तिच्या हवाली
हजारदा ती भेटते
बोलुबोलु वाटते
बोलणे मनातले
परि मनीच राहते
मोहिनी तिची अशी फुले जशी हजार भोवताली
No comments:
Post a Comment