पाण्यातले पहाता प्रतिबिंब,Panyatale Pahata Pratibimba

पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे
आले मनात नवखे उमलून भाव सारे

माझ्याच लोचनांना झाले अनोळखी मी
कळले न पाऊले की सोडूनी जाती भूमी
येती कसे फुलुनी अंगावरी शहारे

मज पाहू पाहू वाटे अवघी निसर्गशोभा
माझा नि सृष्टीचा या आहे जुना घरोबा
धनदौलती सुखाच्या उघडूनी देती दारे

नसता मनात माझ्या मज आज सौख्य भेटे
ओठांत हे सुखाचे सुमधूर गीत येते
मनी मोर धुंद होती उभवूनिया पिसारे

No comments:

Post a Comment