पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे
प्रतिबिंब हे कुणाचे लावण्य हे निराळे
हे केस रेशमाचे, ही ऐट पाहण्याची
ही शुद्ध जीवघेणी हालचाल पापण्यांची
ओठी जरी अबोली, अंगात वीज खेळे
भिवई चढे कशाने, रागेजशी अशी का ?
तू कोण मोहिनी की आहेस चंद्रलेखा ?
का मानवी दिठीने कांती तुझी विटाळे
असतीस फूल जरि तू, तुज मी खुडून घेते
वेणीत माळते गे आनंदगीत गाते
आहेस स्त्री परंतु, हेवा मनी उफाळे
No comments:
Post a Comment