पाहुणा म्हणूनी आला,Pahuna Mhanuni Aala

पाहुणा म्हणूनी आला, जरा घरात थारा दिला
दांडगाई करुनी ग बाई चार दिसात घरधनी झाला

भोळीस भासला भोळा
साधाच आणि मनमोकळा
परि अंगात नाना कळा
डोळ्यांस लावता डोळा, मज पुरता कावा कळला

पचताच पहिली ही खोडी
करी खुशाल लाडीगोडी
हृदयीचे कुलुपही तोडी
भर दिवसा करी घरफोडी, चोरटा घरामधी घुसला

No comments:

Post a Comment