निघाले आज तिकडच्या घरी
एकदाच मज कुशीत घेई पुसून लोचने आई
तुझी लाडकी लेक आपुले घरकुल सोडुनि जाई
तव मायेचा स्पर्श मागते अनंत जन्मांतरी
पडते पाया तुमच्या बाबा काय मागणे मागू
तुम्ही मला आधार केवढा कसे कुणाला सांगू
या छत्राच्या छायेखालुन सात पावलांवरी
येते भाऊ, विसर आजवर जे काही बोलले
नव्हती आई तरिही थोडी रागावून वागले
थकले अपुले बाबा आता एकच चिंता उरी
No comments:
Post a Comment