ना ना ना ना नाही नाही नाही ग !
आता पुन्हा मजसि येणे नाही ग !
घन भरुन भरुन झरे गगन वरुन
कुणि साजण दुरुन मज दिसे कि हसे
खुणवि सये बाइ ग !
ना ना ना ना नाही नाही नाही ग !
बोलति चुडे किण किण किण, कलशि जल गाते ग !
नूपुर बोले छुन छुन छुन, पाउल पुढे जाते ग !
नवल घडे अहा अहा अहा
हृदय धडधडे कि उडे पदर सये बाइ ग !
ना ना ना ना नाही नाही नाही ग !
गहन वन झाले ग शीतल वारा
भिजलि तनु सारी ग झेलून धारा
पवन वाजे सण सण सण, वेढुन मज घेतो ग
भ्रमर बोले गुण गुण गुण, साजण साद देतो ग !
नयन झरे अहा अहा अहा
अधर थरथरे कि झुरे आतुर मन बाइ ग !
ना ना ना ना नाही नाही नाही ग !
नाही सुचत काम नाही रुचत धाम
मनमोहन श्याम मज दिसे कि हसे
सजण ठायि ठायि ग !
ना ना ना ना नाही नाही नाही ग !
No comments:
Post a Comment