बलसागर तुम्हि वीरशिरोमणि कोठें तरि रमलां ।
आश्वासन जिस दिलें तिला कां विसरुनियां गेलां ॥
पेरियलें जें प्रीतितरूचें बीज हृदयिं त्याला ।
अंकुर येउनि सुदृढ त्याचा वृक्ष असे झाला ।
सुंदर तुम्ही मूर्तिमान तच्छायेला बसलां
चित्र असे हृदयांत कोंदतां ठाव न अन्याला ॥
पांडुकुमारा पार्थ नरवरा, राखा वचनाला ।
निश्चय माझा नढळे जरि हा कंठ कुणीं चिरला ॥
No comments:
Post a Comment