आज अचानक दिसले नयनी
बहरलेले नंदनवन अंगणी
सपर्ण तरूवर गाई कोकिळ
ऋतू वसंताची ही चाहूल
नकळत कोठून पावा मंजूळ गुणगुणतो कानी
वसंतराणी थयथय नाचते
सप्त सुरांतून लकेर घुमते
रोमांचाने पुलकीत होते अंग अंग ह्या क्षणी
पानोपानी फुलाफुलावर
नवरसगंधाचा हा बहर
अनेक झुंबर आम्रतरूवर लावियले कोणी
No comments:
Post a Comment