त्या सावळ्या तनूचे
मज लागले पिसे ग
न कळे मनास आता
त्या आवरू कसे ग !
ये ऐकण्यास जेव्हा
त्याचा सुरेल पावा
चोहीकडे बघे मी
परि ना कुठे दिसे ग !
हलतो तरू-लतांत
हा खोडसाळ वात
आलाच वाटतो 'तो'
मी सारखी फसे ग !
खुपते तनूस शेज
क्षणही न येत नीज
डोळ्यांस तो दिसावा
हृदयात जो वसे ग !
No comments:
Post a Comment