तूच कर्ता आणि करविता
शरण तुला भगवंता
मी शरण तुला भगवंता
तुझिया श्वासे पान हालते
हर्षे तुझिया फूल फुलते
तेज झळाळत गगनही झुलते
रविचंद्राचा तू निर्माता
सुखदुःखाची ऊनसाउली
तुझीच जाणीव वेळोवेळी
तुझ्या कृपेच्या पंखाखाली
जीवदान ते मरणा मिळता
देऊळ तूचि तूच मूर्ती
तूच आरती पूजा-भक्ती
तूच असता माझी पूर्ती
मागायचे काय अनंता ?
No comments:
Post a Comment