तू विसरुनि जा रे विसरुनि जा
तुझ्या जीवनी चुकुनी आले, चुकले होते वाट
यौवनाची आली चाहुल, तिथे थबकले प्रीतीपाऊल
परिचय झाला आणिक अवचित केली जिवाला साथ
दिनराती ज्या स्वप्नी रमले, प्रीत-स्वप्न ते पुरे भंगले
दृष्ट लागली सांग कुणाची, फसला सारा घाट
इच्छा एकच उरी धरी मी, तुला वरावे पुढल्या जन्मी
या जन्मी तर असाच साहिन दैवाचा उत्पात
No comments:
Post a Comment