तूं टाक चिरुनि ही मान, नको अनमान ।
नउ मास वाहिले उदरिं तिचा धरिं,
कांहि तरी अभिमान ॥
तो कसाब झाला तात ।
करूं धजे मुलीचा घात ।
मग बरा तुझा मउ हात ।
जा, विसरुनि माया सारी,
करीं घे सुरी, धरीं अवसान ॥
हें कठिण दिसे जरि काज ।
विष तरी जरासें पाज ।
परि ठेंवू नको जगिं आज ।
जी दु:ख मुलीचें निवारिना ।
ती माया नव्हे दुस्मान ॥
No comments:
Post a Comment