तू नसतिस तर, तू नसतिस तर तू नसतिस तर गेले असते रोप चिमुकले सुकून-वाकुन तू नसतिस तर केले असते कुणी तयावर अमृतसिंचन ? तू नसतिस तर मिळता कोठुन घरट्याचा हा रम्य निवारा तू नसतिस तर मिळता कोठुन पंखाखाली गोड उबारा ? तू नसतिस तर कळली नसती कळ्या-फुलांची कोमल बोली तू नसतिस तर मिळली नसती मृदु शीतलता चांदण्यातली ! तू नसतिस तर कळले नसते जीवन म्हणजे अथांग प्रीती तू नसतिस तर जुळल्या नसत्या गीताच्या या मंजुळ पंक्ती !
No comments:
Post a Comment