तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकुरे
पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे
शरद चांदण्यातली भेट आठवे मला
गुपित सांगता तुझा अधर मात्र रंगला
रास संपला तरी भास अंतरी उरे
तू सखे अजाणता कर करात गुंफिला
तुला-मला तसे बघून गगनि चंद्र लाजला
त्या स्थळी अजून मंद बकुल गंध मोहरे
स्वप्नचूर लोचनात एक रम्य आकृती
सूर सूर होत सर्व भावना निनादती
वाजतात पायिची बघ अजून नूपुरे
No comments:
Post a Comment