दोन ध्रुवांवर दोघे आपण,Don Dhruvanvar Doghe

दोन ध्रुवांवर दोघे आपण
तू तिकडे अन्‌ मी इकडे
वाऱ्यावरती जशी चुकावी
रानपाखरे दोहिकडे


दिवस मनाला वैरि भासतो
तारा मोजित रात गुजरितो
युगसम वाटे घडीघडी ही
कालगती का बंद पडे ?


वसंतासवे धरा नाचते
तांडव भीषण मज ते गमते
गजबजलेल्या जगात जगतो
जीवन एकलकोंडे


नि:श्वसिते तव सांगायाला
पश्चिमवारा बिलगे मजला
शीतल कोमल तुझ्या करांचा
सर्वांगी जणु स्पर्श घडे

स्मृति-पंखांनी भिरभिर फिरते
प्रीतपाखरू तुझ्याच भवते
मुक्या मनाचे दु:ख सागरा
सांग गर्जुनी तू तिकडे

तोच असे मी, घर हे तेही
तोच सखी, संसार असेही
तुझ्यावाचुनी शून्य पसारा
प्राण तिथे अन्‌ देह इथे

No comments:

Post a Comment