धागा धागा अखंड विणूया
विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया
अक्षांशाचे रेखांशाचे
उभे आडवे गुंफुन धागे
विविध रंगी वसुंधरेचे
वस्त्र विणिले पांडुरंगे
विश्वंभर तो विणकर पहिला
कार्यारंभी नित्य स्मरुया
करचरणांच्या मागावरती
मनामनांचे तंतू टाका
फेकुन शेला अंगावरती
अर्धिउघडी लाज राखा
बंधुत्वाचा फिरवित चरखा
एकत्वाचे सूत्र धरूया
No comments:
Post a Comment