ठुमकत आल्या किती गौळणी Thumakat Alya Kiti Gaulani

राधा रमणी मोहन हरिणी चाले चपल चरणी

ठुमकत आल्या किती गौळणी




आले नेसून काळी चंद्रकळा

सोळा शिणगार आले घालून गळा

घडा लाजंचा डोईवर डुचमळला

अन्‌ भिजली तनू देखणी




आली चंद्रावळ मी नखऱ्याची

लाल पैठण जरीच्या पदराची

जशी रंभा अप्सरा इंद्राची

उभी धरणीच्या अंगणी




नको कान्हा अशी ही बळजोरी

मथुरेच्या जाऊ दे बाजारी

दिसं बुडताना येईन माघारी

तुज पुरवीन मी मागणी

No comments:

Post a Comment