श्रावणसरी Shravansari

सोशिक माती अशी सारखी वर्षावाने भिजे


युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे
केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा


असा चालला इथे सनातन सृजनाचा सोहळा
कशी मनातून मने गुंतती भाव दाटती उरी


उन्हात न्हाऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी
जलथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी


कधी हासऱ्या, कधी लाजऱ्या, आल्या श्रावणसरी

No comments:

Post a Comment