जो काल इथे आला,Jo Kaal Ithe Aala

जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता
आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता

ओलेत्या चिंब क्षणीही रक्तात निखारे होते
ती जुनीच होती सलगी, पण स्पर्श कोवळा होता

वेचली फुले थेंबांची ओठही फुलांचे होते

डोळ्यांत पावसामधला निथळता जिव्हाळा होता

पाऊस असा आला की अद्याप थांबला नाही
ह्या अशा पावसासाठी सोसला उन्हाळा होता

8 comments: