जीवनगाणे गातच रहावे,Jivan Gane Gatach Rahave


जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !

सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदये हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्या-माझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे !

चिमणाबाई हिरमुसली, गाल फुगवुनी का बसली ?
सान बाहुली ही इवली लटकी-लटकी का रुसली ?
रुसली रुसली, खुदकन हसली, पापे किति घ्यावे !
जीवनगाणे गातच रहावे !


मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या मातीला, या प्रीतीला, हितगुज सांगावे
जीवनगाणे गातच रहावे !

No comments:

Post a Comment