जीवनाची वाट वेडी,Jeevanachi Vaat Vedi

जीवनाची वाट वेडी ती कधी ना संपते !
थांबतो थोडा प्रवासी, वाट कुठली थांबते ?

आसवांसाठीच डोळे- पापण्यांचे रांजण
हुंदक्यांचा हक्क येथे, हासण्यावरी बंधन
एकटे, बिन-चेहऱ्याचे, दैव केवळ हासते


भोवताली दिसती जे जे, ते सुखाचे सोबती
जीवनी कोणी न साथी, कोण धावे संकटी
मरण घेऊन रूप गोंडस जगून पुन्हा पाहते

No comments:

Post a Comment