जेथोनि उद्गार प्रसवे,Jethoni Udgar Prasave

जेथोनि उद्गार प्रसवे ॐकार ।
तोचि हा श्रीधरू गोकुळीं वसे ॥१॥

जनक हा जगाचा जीवलग साचा ।

तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥

नमो ये वैकुंठी योगियांचे भेटी ।
पाहतां ज्ञानदृष्टी नये हातां ॥३॥


निवृत्ति साधन कृष्णरूपे खूण ।
विश्व विश्वीपूर्ण हरि माझा ॥४॥

6 comments: