जय जयकारा करा गर्जू द्या ज्ञानांच्या वाटा
देवाहून हा सान, थोर रे देव माणसांचा
तो नीतीचा पुतळा केवळ निंदेने मळला
हरपून गेल्यावरी हिऱ्याचा उजेड त्यां कळला
पस्तावा हो या गावाला आता अपराधाचा
चला उभारू स्मारक त्याचे मोक्याच्या जागी
असा कधी ना झाला होईल जन-नेता त्यागी
मावळल्याने होतो का रे अस्त भास्कराचा
गेला तो तरी स्मरणरूपाने आपणात आहे
जोवर वरदा कृष्णा गोदा देशातून वाहे
कीर्ती मूर्ती अमर तयाची अमर मार्ग त्याचा
No comments:
Post a Comment