जय जय हो महाराष्ट्रचा
मर्द वीराचा निधड्या छातीचा
राखिली माय बहिणीची लाज
देशप्रेमाचा चढला सरताज
गाऊ या कवनं त्यांची आज
इतिहास सांगतो कथा ऐकुनी घ्यावी
ऐकुन अंगाअंगाची होऊ दे लाही
पेटून उठू दे रान देशाच्या पायी
हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजीपाठी
मावळे येती, स्थापिले राज्य मराठ्यांचे
मनाच्या मानी निष्ठेचे,
फुलांचे, दगडकाट्यांचे हो
चवताळून दुश्मन आला
केला हल्ल्यामागून हल्ला
कुणी उदार जिवावर झाला
बेजार केलं वैऱ्याला हो
नरवीर तानाजी सिंह सिंहगडी लढला
बाजीने लढविली खिंड, जिंकुनी पडला
प्राणांचे करुनी बलिदान
राखिला मान वाढली शान
देश हा झाला बलशाली
संकटे पुन्हा परत आली
कुणा पाप्याची दृष्ट झाली
गिरा लागला स्वातंत्र्याला
शिवरायांनी देह ठेवला
फंदफितुरीला ऊतच आला
वीर संभाजी कैदी झाला
पिंजऱ्यात तळमळे वाघ, खवळला नाग
झाली अंगाअंगाची आग
शहानं केला घोर अपमान
बोलला ताठ ठेवुनी मान
No comments:
Post a Comment