जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती
कळे न त्यांना मरण उद्याचे भाळी या अंती
भविष्य कळते काय कुणाला
फूल आजचे धूळ उद्याला
निर्माल्याला कधी घेतसे कोणी का हाती
जन्म घेऊनि मृत्यू येतो
मृत्यूसंगे जीव जन्मतो
युगायुगांचे चक्रसारखे फिरते हे भवती
का दुसऱ्याला उगा हसावे
तेच आपुल्या नशिबी यावे
चुकेल का कधी जे लिहिलेले कर्माने अंती
No comments:
Post a Comment