जाशिल कोठे मुली तू ?
नेशिल तेथे मुला तू !
नेऊ कुठे मी तुला सुंदरी
स्वप्नात ने यक्षभूमीवरी
स्वप्न कोठे वसे ? त्यात जावे कसे ?
हात हाती धरी संगती चाल तू !
प्रितिचा प्रांत का अजुन ना लागला
भृंग गाति पहा चुंबताना फुला
वृक्ष आणि लता, डोलति बिलगता
पाहुनि घे गडे प्रितीची रीत तू !
आनंद लाभे मना, लोचना
प्रितीमुळे ही फुले भावना
ती कथा राहिली, प्रीत ना पाहिली
पांघरू पाहसी व्यर्थ का वेड तू ?
No comments:
Post a Comment