जाहली जागी पंचवटी,Jahali Jagi Panchavati

जाहली जागी पंचवटी !
कळ्याफुलांचे सडे सांडले झाडांच्या तळवटी

जय हरी विठ्ठल, हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !

पहाट वारा सुटला शीतळ
अंब्यावरती बोले कोकिळ
तापसबाला जळा चालल्या कुंभ घेऊनी कटी
जाहली जागी पंचवटी !

सडा शिंपण्या आश्रमांगणी
कवाड उघडी जनकनंदिनी
उभा पाहिला दीर लक्षुमण राखीत पर्णकुटी
जाहली जागी पंचवटी !

बघुन तयाची निष्ठा-प्रीति
जानकी नयनी जमले मोती

त्या मोत्यांचा सडा सांडला भूमिवर शेवटी
जाहली जागी पंचवटी !

No comments:

Post a Comment